Chakan : ‘शेतात कडब्याची गंज रचू नका’ म्हटल्याने वृद्ध शेतकऱ्याला मारहाण

An old farmer was beaten up for saying, 'Don't make rust in the field.'

एमपीसी न्यूज – ‘माझ्या शेतात कडब्याची गंज रचू नका’, असे शेतकऱ्याने सांगितले. यावरून बेकायदेशीरपणे गंज रचणाऱ्या चौघांनी वृद्ध शेतकऱ्याला तसेच त्यांच्या  मुलाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी साडेआठ वाजता खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.

गुलाब किसन जरे (वय 69, रा. जरेवस्ती, वाकी बुद्रुक, ता. खेड), सुभाष जरे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी गुलाब जरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी कांताराम गुलाब जरे, शालन कांताराम जरे, प्रवीण कांताराम जरे, सीमा प्रवीण जरे (सर्व रा. जरेवस्ती, वाकी बुद्रुक, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रविवारी सकाळी फिर्यादी यांच्या शेतात कडब्याची गंज रचत होते. त्यावेळी फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि सुनेने आरोपींना ‘इथे गंज रचू नका, ही आमची जागा आहे’ असे म्हटले.

याचा राग मनात धरून आरोपी शालन आणि सीमा यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने धक्काबुक्की केली. अन्य आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.