Chakan : चाकण पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी ; वरिष्ठांकडून समाधान

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने बुधवारी (दि.13) चाकण पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी ही तपासणी केली. पाटील यांनी पोलीस स्टेशनची आंतरबाह्य तपासणी केली. त्यात सर्व प्रकारचे अभिलेख, गुन्हे व तपास, शस्त्रास्त्रे अद्यावतता, तंटामुक्त समित्यांचे कार्य, महत्वाची कागदपत्रे, फाईलींची तपासणी केली. यांसोबतच पोलीस ठाण्याची परिसर व संबंधित सर्व बाबींची तपासणी करून समाधान व्यक्त केले.

वार्षिक तपासणी दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या तपासणी प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात चाकण पोलीस ठाण्याचा समावेश झाल्यानंतर गुन्ह्यांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा करण्यात आल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

चाकण दंगलीचा तपास पारदर्शी 

चाकण मधील दंगलीतील गुन्ह्यांचा तपास करताना ज्या 110 गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यांच्या बाबत पोलिसांकडे भक्कम पुरावे होते. यामध्ये नागरिकांना पुढे करून काहींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस पुरावे पोलिसांच्या हाती असल्याने पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होते. दंगलीच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी या विशेष तपास पथकाच्या कामाचा चांगला परिणाम होऊन नागरिकांत विश्वास निर्माण झाला असल्याचे पोलीस उपायुक्त व एसआयटीच्या प्रमुख स्मार्तना पाटील यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like