Chakan : पाण्याच्या टाकीतून पाईपलाईन करण्यावरून ग्रामसभेत वाद; तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील सुपे गावात जिल्हा परिषदेने बांधलेल्या टाकीतून गावासाठी पाईपलाईन करण्यावरून ग्रामसभेत वाद झाला. यामध्ये तीन जणांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश दत्तू मोहन, शिवाजी काळभोर, अवधूत किसन मोहन (सर रा. सुपे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सचिन कोंडीराम ससाणे (वय 36) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलयुक्त शिवाय योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने ससाणे यांच्या जमिनीत सुपे बौद्ध वस्तीसाठी पाण्याची टाकी बांधून दिली आहे. 28 मे रोजी गावात ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत सुपे बौद्ध वस्तीमधील टाकीतून संपूर्ण गावासाठी पाण्याची पाईपलाईन बांधण्याची चर्चा झाली.

यासाठी काही गावक-यांनी विरोध केला. यावेळी तिन्ही आरोपींनी ससाणे यांच्या आईला आणि भावाला जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.