Chakan: राष्ट्रवादी प्रवेशानंतर अतुल देशमुख यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

एमपीसी न्यूज – भाजपचे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर (Chakan)शनिवारी (दि. 13 एप्रिल)  त्यांचे चाकण शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभेच्या जागेवर दावा सांगेल. उमेदवारीचा शब्द देशमुखांना(Chakan) जेष्ठ नेते शरद पवार, अमोल कोल्हे यांच्याकडुन मिळाला आहे का? त्यामुळे देशमुखांचा प्रवेश विधानसभेच्या अगोदर या जागेवर दावा सांगण्यासाठी आहे का व त्यांची उमेदवारी निश्चित केली जात आहे का? असे विविध प्रश्न निर्माण केले जात आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर अतुल देशमुख यांनी सांगितले कि, राष्ट्रवादी ( श.प.)  पक्षात प्रवेश केवळ शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी करण्यात आलेला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.