Chakan : रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रिक्षा घेऊन जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून तिघांनी बेदम मारहाण केली. यामध्ये रिक्षाचालक तरुण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या रिक्षाची देखील तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री चाकण-पुणे रोडवर कुरुळी फाटा येथे घडली.

जीवन शहादेव धवन (वय 26, रा. चाकण) असे जखमी रिक्षाचालक तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास चाकण-पुणे रस्त्याने त्यांची रिक्षा (एम एच 14 / एच एम 1516) घेऊन जात होते. ते कुरुळी फाटा येथे आले असता एका दुचाकीवरून (एम एच 12 / डी एन 8577) आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. जीवन यांनी रिक्षा रस्त्याच्या बाजूला लावून अडविल्याबाबत विचारले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी काठीने मारहाण केली. तसेच दगड अंगावर फेकून जखमी केले. यामध्ये जीवन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.