BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : चाकण सोसायटीच्या अध्यक्षपदी बबनराव जाधव तर उपाध्यक्षपदी परदेशी

एमपीसी न्यूज- चाकण विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव यांची तर उपाध्यक्षपदी अशोक परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मावळते अध्यक्ष शांताराम मेदनकर व उपाध्यक्ष भीमाबाई जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी मंगळवारी (दि.२५) निवडणूक घेण्यात आली. नूतन अध्यक्षपदासाठी आयोजित विशेष सभेत जाधव यांचा एकमेव व उपाध्यक्षपदासाठी परदेशी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जे.बी.मुलांनी यांनी जाहीर केले.

या बैठकीस मावळते अध्यक्ष शांताराम मेदनकर, मावळत्या उपाध्यक्षा भीमाबाई जाधव, संचालक जगदीश मेदनकर, भरत गोरे, अशोक गोरे, अनुसया मुटके, बाबाजी राक्षे, वसंत कड, अशोक कड, सतीश कड, उमेश आगरकर आदींसह माणिक गोरे, नवनाथ मुटके, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, संस्थेचे सचिव अरुण धाडगे आदी उपस्थित होते.

खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या सूचनेनुसार ही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक लोकाभिमुख काम करण्यात येणार आहे असे नूतन अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like