Chakan : बजाज इलेक्ट्रिकलच्या कर्मचाऱ्यांनीच केला खड्डा दुरुस्त

एमपीसी न्यूज- तळेगाव-शिरूर रस्त्यावर चाकणजवळ असलेल्या बजाज इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीसमोर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डा पडला होता. हा खड्डा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज, शनिवारी स्वतः खडी, दगड मातीने भरून काढला.

या कामामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर झाली असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. या कामासाठी कंपनीचे मनुष्यबळ प्रमुख ललित भागवत, अनिल गुप्ता, नितीन देव, अभिजत दीक्षित, नरेन्द्र बाचल, सुरेश कोबल आणि सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.