Chakan : बनावट सहीच्या आधारे पोस्टाच्या खात्यातून साडेसहा हजार लंपास

एमपीसी न्यूज – महिलेची बनावट सही करून तिच्या खात्यातून 6 हजार 525 रुपये काढून घेतले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील कुरुळी डाकघर येथे घडला.

खेड विभागाच्या उपविभागीय डाक निरीक्षक नेहा कुमारी (वय 28) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश राजू पाचारणे (रा. कुरुळी, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी डाकघर येथे वनिता बाबासाहेब गायकवाड यांचे दोन खाते आहेत. या खात्याची मुदत संपत असल्याने वनिता यांनी दोन्ही खात्याचे पासबुक मंगेश याच्याकडे विश्वासाने ठेवण्यास दिले.

मंगेश याने वनिता यांची बनावट सही करून त्यांच्या खात्यातून 6 हजार 525 रुपये काढून त्यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.