Chakan : जमिनीच्या वादातून बाप-लेकाला मारहाण

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून एकाने बाप-लेकाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी बाराच्या सुमारास खेड तालुक्यातील शेलू गावात घडली.

समीर बबन ठोंबरे (वय 20, रा. शेलू गाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सत्यवान सुदाम ठोंबरे (रा. शेलू गाव, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे वडील आणि चुलत चुलते यांच्यासोबत जमिनीची मोजणी करीत होते. त्यावेळी आरोपीने जमिनीच्या वादातून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यांच्या वडिलांच्या डोक्यात दगड आणि लोखंडी खुरप्याच्या मुठीने मारून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.