Chakan : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; दोघांना अटक

ही घटना गुरुवारी (दि. 6) दुपारी साडेपाच वाजता खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे घडली. : Beating a woman for petty reasons; Both arrested

एमपीसी न्यूज – पतीला मारहाण केल्याचा जाब विचारणा-या महिलेला दोघांनी मिळून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 6) दुपारी साडेपाच वाजता खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे घडली.

अनिकेत किसन काटकर, कुणाल विद्याधर काटकर (रा. साबळेवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या भावकीतील एकाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने त्यांच्या सावडण्याचा विधी गुरुवारी होता. त्यासाठी त्यांचे पती गुरुवारी सकाळी दुचाकीवरून जात होते.

गावातून जात असताना आरोपी अनिकेत याच्या अंगावर रस्त्यावरील पाणी उडाले. यावरून अनिकेत आणि फिर्यादी यांच्या पतीचे किरकोळ भांडण झाले.

दुपारी साडेपाच वाजता फिर्यादी त्यांच्या घरासमोर भांडी घासत होत्या. त्यावेळी आरोपी घरासमोरून जात होते. फिर्यादी यांनी आरोपींना सकाळी माझ्या पतीला का मारले, असा जाब विचारला.

त्यावरून आरोपींनी काठीने आणि हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. दमदाटी करून आरोपी तिथून निघून गेले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.