Chakan : किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून दोघांना दगडाने आणि काठीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी साडे पाचच्या सुमारास साबळेवाडी येथे घडली.

संतोष बापूजी साकोरे (वय 30, रा. साबळेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत बाळासाहेब काटकर, शोभा बाळासाहेब काटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत याने सोमवारी दुपारी फिर्यादी यांच्या घरात येऊन ‘माझे एका महिलेशी संबंध आहेत, अशी चर्चा का करतो’ असे म्हणत फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले.

त्यावेळी फिर्यादी यांची बहीण आशा बाबूजी साकोरे ही भांडणे सोडवण्यासाठी आली असता आरोपीची आई शोभा हिने हाताने व काठीने मारहाण करून शिवीगाळ करत बहिणीलाही जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.