Chakan : कंपनीतील किरकोळ भांडणातून एकमेकांवर चाकू हल्ला; तिघे जखमी

सात जणांवर गुन्हा दाखल; खराबवाडीतील घटना

एमपीसी न्यूज- चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कंपनीच्या बाहेर आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी धारदार चाकूच्या साह्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. ही घटना खराबवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि.१८) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यामध्ये तीन जण जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारीवरून सात जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विजय इंगोले, अमोल अशोक इंगोले व विरबाजी उर्फ बाजी बाबा चव्हाण अशी यामध्ये जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. अमोल अशोक इंगोले ( वय २६ वर्षे, सध्या रा स्वामी समर्थ बिल्डिग, दावडमळा ,चाकण, ता. खेड, मुळ रा. टाकळी, जि नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरबाजी बाबा चव्हाण (रा. दावडमळा , चाकण ) अक्षय खरमारे (रा आंबेठाण चौक, चाकण) अक्षय पाचपुते (रा. आंबेठाण चौक चाकण ) व गणेश शिंदे (पुर्ण पत्ता माहीत नाही ) अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर विरबाजी उर्फ बाजी बाबा चव्हाण (वय २२ वर्षे) यांच्या फिर्यादीवरून अमोल अशोक इंगोले, अशोक इंगोले, नितीन उटकर ( तिघेही रा. दावडमळा, चाकण, ता .खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराबवाडी (ता. खेड) येथील विन्डसस्ट्राँग कंपनीत झालेल्या किरकोळ भांडणातून रात्रीच्या वेळी ही तुंबळ हाणामारी झाली. लोखंडी चाकूच्या साह्याने एकमेकांच्या पोटावर गंभीर जखमा करण्यात आल्या असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.