Chakan : पत्नीच्या प्रियकराकडून पतीला मारहाण

एमपीसी न्यूज : मला शिवीगाळ करतो का? म्हणत पत्नीच्या प्रियकरानेच पतीला मारहाण केली आहे. हा प्रकार 20 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता तळेगाव चाकण (Chakan) रोडवर घडला.

पतीने दिलेल्या तक्रारीवरून विक्रम सुरेश शेटे (रा. तांदूळवाडी, बारामती) व त्याच्या सोबत आलेला साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : महिलेला कामावर ठेऊ नका म्हणून तिची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या गाडीत पेट्रोल भरून पत्नीला आणण्यासाठी जात असताना आरोपी तेथे दुचाकीवरून आला व त्याने फिर्यादीला आडवले. त्यावेळी त्याने तुला लय माज आलाय का, मला शिवीगाळ करतो का म्हणत फिर्यादीच्या पायावर लाकडी दांडक्याने, लोखंडी रॉडने व दगडाने (Chakan) मारहाण केली. यावरून महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.