Chakan: पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मंगळवारी रात्री आर्यन दुचाकीवरून जात असताना त्यांना चाकण मधील आंबेडकर उद्यानाजवळ गाठले.

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला कोयते, रॉड आणि दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.4) रात्री साडेसातच्या सुमारास आंबेडकर उद्यानाजवळ चाकण येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव उर्फ नाम्या नाईक, विवेक कु-हाडे, प्रणव शिंदे, आनंद कोरम शेट्टी (सर्व रा. खंडोबा माळ, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आर्यन राणू प्रधान (वय 19, रा. बीड वस्ती, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आर्यन आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मंगळवारी रात्री आर्यन दुचाकीवरून जात असताना त्यांना चाकण मधील आंबेडकर उद्यानाजवळ गाठले. कोयते, रॉड, दगडाने मारहाण करत आर्यन यांना जखमी केले. कोयत्याने वार करत परिसरात दहशत निर्माण केली.

याबाबत चाकण पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 324, 341, 34, हत्यार कायदा, मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.