BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : भांबोलीचे माजी सरपंच प्रदीप नवरे यांची आत्महत्या

0 899
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमधील छतावरील लोखंडी बारला भांबोली ( ता.खेड ) गावच्या माजी सरपंचाने दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी (दि. 13) सकाळी पावणेसात वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट झाले नाही.

प्रदीप ज्ञानेश्वर नवरे ( वय 50 रा. भांबोली, पो. वासुली, ता. खेड,) असे आत्महत्या केलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. भांबोली गावचे पोलीस पाटील साहेबराव अशोक राऊत यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की, प्रदीप नवरे हे खेड तालुक्याच्या भांबोली गावचे माजी सरपंच होते. नवरे हे उसाच्या रसाचे गु-हाळ चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. सोमवारी ( दि. 13 ) सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान त्यांनी ते राहत असलेल्या बंगल्याच्या पार्किंग मधील पत्राच्या शेडमधील छतावरील लोखंडी बारला पांढऱ्या रंगाच्या सुताच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातू, असा परिवार आहे. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3