Chakan: विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक, ट्रकचालकालाच केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज –  ‘चोर ते चोर आणि  वर शिरजोर’  ह्या म्हणीप्रमाणे, मंगळवारी  (दि.2) चाकण येथे तळेगाव चौक दुचाकीस्वार व त्याचे मित्र विरुद्ध दिशेने येत असता            ट्रकला धडक दिली व नंतर ट्रक चालकालाच (Chakan) लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

संकेत रामदास जाधव (वय 27 रा.वाकी, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे साथीदार सचिन वखरे व  इतर दोन अनोळखी इसमावर (Chakan) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिव बगेल आणि मोतीलाल बगेल (वय 40 रा.मध्यप्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : … तर वाहनांचा परवाना रद्द करुन फौजदारी गुन्हा दाखल करणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ( शिव बगेल आणि मोतीलाल बगेल) हे त्यांचा ट्रक घेवून जात होते यावेळी आरोपी दुचाकीवरून विरुद्ध दिशेने येत होते. त्यांनी उजव्या बाजुने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता ते फिर्यादीच्या ट्रकला धडकले.  त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या प्रकरणात  फिर्यादीने चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यावरून चाकण पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.