Chakan : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 22) दुपारी साडेचारच्या सुमारास खराबवाडी येथे झाला.

सुभाष तुळशीराम उंबरे असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर दत्ता शांताराम शिंदे (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. दत्ता यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दत्ता आणि त्यांचा मामा मयत सुभाष हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / एफ 1936) खराबवाडी येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने (एच आर 55 / एस 9559) दुचाकीला धडक दिली. यामध्ये सुभाष यांचा मृत्यू झाला. तर दत्ता गंभीर जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.