Chakan : रासे येथे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त शिक्षक वाल्मिक रघुनाथ वाडेकर (गुरुजी) यांनी यांनी केलेल्या ‘रामकृष्णहरी’ १ लाख ७१ हजार लेखन नामजप उदिष्टपूर्ती सोहळा रासे (ता. खेड) येथे संपन्न झाला. यावेळी वाडेकर गुरुजी यांनी लिहिलेल्या ‘फुला सवे गंध मातीला’ आणि हे रासे गावचा इतिहास सांगणारे ‘यांनी घडवीला गाव’ अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा खेडचे आमदार सुरेश गोरे आणि परिसरातील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रासे गावातील, परिसरातील शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांचा सन्मान करण्यात आला. पिंपरी ठाकुर येथील निर्मल बाल अनाथाश्रमातील ईन्हटरसाठी, रेणुका विद्यालयाला साऊंड सिस्टिमसाठी, कै.महादेवबुवा काळोखे दिंडी सोहळा पंढरपूर येथील नवीन धर्मशाळेसाठी, तसेच चाकण एमआयडीसीतील काही गरजू कामगारांच्या आई- वडिलांसाठिच्या वैद्यकीय खर्चाच्या मेडिकल ट्रस्टसाठी मदत करण्यात आली.

  • यावेळी खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे, प्रा.शिवाजीराव मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, किरण मांजरे, प्रकाश खराबी,संत तुकारामचे संचालक संभाजी पवार,पिं.चिं.चे मा.नगरसेवक अरुण बोर्हाडे,अशोक खांडेभराड, पुण्याचे मा.नगरसेवक शाम मानकर, प्रा.शिवाजीराव मोहिते आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

चेतन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.लक्ष्मण राऊत यांनी प्रास्ताविक केले. आभार राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे सचिव अविनाश वाडेकर यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिकांनी वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पण केलेल्या वाल्मिक वाडेकर गुरुजींचे अभीष्टचिंतन करून विशेष सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.