Chakan : कुरळीत पीएमपीएमएल बस फोडली; दोघांना अटक

चालकास बेदम मारहाण, बसचे सुमारे 65 हजारांचे नुकसान 

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसचालकाला मारहाण करत बसची तोडफोड केली. यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि. 14) दुपारी अडीच ते रात्री साडेनऊ दरम्यान कुरुळी गावच्या हद्दीत घडली.

संदीप तुकाराम पाटेकर (वय 29), अमोल तुकाराम पाटेकर (वय 21, दोघे रा. मेदनकरवाडी फाटा, पानसरे मळ, ता. खेड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पीएमपीएमएल बसचालक अशोक कोंडीबा चितारे (वय 41, रा. देहूरोड, किवळे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अशोक पीएमपीएमएल बसचालक म्हणून नोकरी करतात. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पायसर फाटा येथे दुपारी अडीच वाजता आरोपींनी त्यांची स्विफ्ट कार बसला आडवी लावली. आरोपींनी अशोक यांची कॉलर पकडत त्यांना बसमधून खाली खेचून जीवे मारण्याची धमकी देत बस पेटवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता चाकणमध्ये ब्ल्यू सहारा हॉटेल शेजारी मोकळ्या जागेत अशोक यांनी ते चालवत असलेली बस (एम एच 14 / ए एच 7173) उभी केली. त्यावेळी आरोपींनी तिथे येऊन बसच्या काचा, आरसे, जीपीएस मशीन आणि टायर फोडून बसचे 65 हजार रुपयांचे नुकसान केले. यावरून फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.