HB_TOPHP_A_

chakan : फरार सराईत गुन्हेगारासह दोघांची रवानगी येरवडा कारागृहात 

चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार यांची माहिती 

691

एमपीसी न्यूज – तेहतीस जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या आणि जेल तोडून फरार झालेला सराईत गुन्हेगार विशाल तांदळेसह त्याच्या दोन साथीदारांची रवानगी मंगळवारी (दि.15) येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी दिली.

HB_POST_INPOST_R_A

विशाल दत्तात्रय तांदळे (वय – 22 वर्षे, रा. बैल बाजार रोड,मंचर, ता. आंबेगाव), गणेश भास्कर वाबळे (वय -18 वर्षे, रा. भेंडमळा, मंचर, ता. आंबेगाव) आणि आरिफ अस्लम नाईकवाडे (वय -21 वर्षे, रा. संभाजीनगर, मंचर, ता. आंबेगाव) अशी कारागृहात रवानगी झालेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तांदळे हा 20 ऑक्टोबर, 2018 रोजी खेड पोलीस ठाण्याचे जेल तोडून फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याने चाकण जवळील खराबवाडी येथे शनिवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास एका बोलेरो मोटारीला (एमएच 14 एसी 6923), स्विफ्ट डिझायर कार (एमएच 14 डीएक्स 8785) आडवी लावून पाच जणांनी मिळून बोलेरो मोटारीतील व्यक्तीला चाकूचा आणि लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. त्याच रात्री चाकण पोलिसांनी सावरदरी येथे पाठलाग करून पाच जणांपैकी वरील तिघांना अटक केली होती. रविवारी (दि.13) त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यालायालाने दिले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.15) पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे त्या तिघांची रवानगी मंगळवारी येरवडा कारागृत करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: