Chakan: महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी परिसरात वीज खंडित

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीच्या 400 केव्ही अतिउच्च दाब लोणीकंद उपकेंद्रात (Chakan)बिघाड झाल्यामुळे चाकण एमआयडीसीमधील महापारेषणच्या तीन अतिउच्च दाब उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या 34 वीजवाहिन्या चा वीजपुरवठा देखील बंद पडला. त्यामुळे चाकण एमआयडीसी व परिसरातील सुमारे 40 हजार 300 घऱगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी (दि. 8) सकाळी 9.31ते 10.15 वाजेपर्यंत बंद राहिला.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद 400 केव्ही अतिउच्च दाब (Chakan)उपकेंद्रातून चाकण एमआयडीसीमधील चाकण 400 केव्ही, चाकण फेज दोन 220 केव्ही व ब्रिजस्टोन 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो. मात्र आज सकाळी 9.31 लोणीकंद उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे सुमारे 181 मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली.

LokSabha Elections 2024 : डॉक्टर म्हणताहेत आम्ही 100 टक्के मतदान करणार

त्यामुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसीमधील महापारेषणच्या तीनही अतिउच्च दाब उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी या उपकेंद्रांतून महावितरणच्या 34 वीजवाहिन्या चा देखील वीजपुरवठा खंडित झाला. चाकण एमआयडीसी व परिसरातील शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, संगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोरी, सारा सिटी, कुरुळी, नाणेकरवाडी, आळंदी फाटा, चिंबोली, निघोजे, मोई आदी गावांतील 800 उच्चदाब व 5500 लघुदाब औद्योगिक ग्राहक तसेच सुमारे 35 हजार घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी 10.14 वाजेपर्यंत बंद राहिला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.