Chakan crime News : कंपनीत घुसून कामगारांना मारहाण, सिक्युरिटी केबीनची तोडफोड

0

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे कंपनीत घुसून कंपनीतील कामगारांसह सुरक्षा रक्षकाला 10 ते 12 जणांच्या अनोळखी टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच सिक्युरिटी केबिनची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 15) दुपारी साडेचार वाजता वासुली येथील सीडी व्हॅक्युम कंपनीत घडली.

अर्जुन हिंदुराव पाटील (वय 38, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 10 ते 12 अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील वासुली येथील सीडी व्हॅक्युम कंपनीत काम करतात. मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास 10 ते 12 अनोळखी लोक जबरदस्तीने कंपनीत आले. आरोपींनी फिर्यादी पाटील, त्यांचे 5 ते 6 सहकारी आणि सुरक्षा रक्षकाला हाताने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी सिक्युरिटी केबिन आणि शॉप फ्लोअरच्या काचा फोडून नुकसान केले. कंपनीत कोणत्याही प्रकारचे काम करू देणार नाही, अशी धमकी आरोपींनी पाटील यांना दिली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.