Chakan: आळंदी-चाकण रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Chakan: car crash on two-wheeler on Alandi-Chakan road one dead माजलगाव फाट्यावर आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या आरोपीच्या कारने जोरात धडक दिली.

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्यातच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमरास आळंदी-चाकण रस्त्यावर माजलगाव फाट्यावर घडली.

रवींद्र मारुती कुधे (वय 34, रा. राहोली, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश वासुदेव पिदुरकर (वय 49, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कार (एमएच 12 क्यूएफ 7296) या कारवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश पिदुरकर यांचे मेव्हणे मृत रवींद्र कुधे हे आळंदी येथील लिडॅक कंपनीत काम करत होते. शनिवारी दुपारी सुट्टी झाल्यानंतर ते दुचाकीवरुन (एमएच 15 ईके 7296) या आळंदी-चाकण रस्त्याने घरी जात होते.

माजलगाव फाट्यावर आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या आरोपीच्या कारने जोरात धडक दिली. यामध्ये रवींद्र हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like