BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : टोळक्याकडून एकाला मारहाण; कारची तोडफोड

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – कारमधून जात असताना सहा ते सात जणांनी त्यांच्या दुचाकी कारला आडव्या लावून कार थांबवली. त्यानंतर टोळक्याने कारची तोडफोड करत कार चालकाला मारहाण केली. यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळी फाटा येथे सोमवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास घडली.

राकेश प्रकाश अत्तरदे (वय 34, रा. मोशी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश त्यांच्या कार (एम एच 14 / जी एच 2280) मधून जात होते. कुरुळी फाटा येथे आले असता आरोपींनी त्यांच्या तीन मोटारसायकल कारला आडव्या लावल्या. त्यामुळे राकेश यांनी कार थांबविली. आरोपींनी लाकडी दांडके, कोयत्याने कारची तोडफोड केली. राकेश यांच्या हातावर आणि डोक्यात कोयत्याने मारले. एकाने कारची फोडलेली काच राकेश यांच्या पाठीत मारली. तसेच अन्य आरोपींनी रस्त्याच्या बाजूला पडलेले दगड राकेश यांना मारले. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.