Chakan : अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या रोड रोमियोवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला त्रास देणाऱ्या(Chakan) दोन रोड रोमियोवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.28) मेदनकरवाडी येथे घडला आहे.

याप्रकऱणी मुलीच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका 18 व 19 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : सुरक्षा रक्षकाला मारहाण करत जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दहावीत शिकत असून ती 15 वर्षाची आहे. ती तिच्या क्लासेसला जाताना व घरी परत येत असताना आरोपी हे गाडीवरून येवून हॉर्न वाजवत, कॉलर उडवून हाताने इशारे करत व  मुलीच्या अंगावर गाडी घातल्यासारखी करत तिला त्रास देत होते. यावरून आरोपींवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.