BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : दारूच्या दुकानातील कॅशिअरला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज – दारूच्या दुकानातील कॅश घेऊन जात असलेल्या कॅशिअरला मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच कोयत्याने वार करून लुटले. कॅशियर कडून सव्वा लाखांची रोकड तसेच त्याच्या साथीदाराचा मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 41 हजार 980 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

बिरू बिभीषण माशाळे (वय 28, रा. मॅक्झिन चौक, भोसरी) असे जखमी कॅशियरचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटारसायकलवरील तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2019 रोजी बिरू रात्री साडेदहाच्या सुमारास चाकण येथील एका दारूच्या दुकानातील कॅश घेऊन त्यांचे मित्र दिलीप भालेराव यांच्यासोबत भोसरीकडे जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना ते कुरूळी येथे आले असता, एका पल्सर मोटरसायकलवरून तीन चोरटे आले. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवला. तर दुसऱ्याने लोखंडी कोयत्याने बिरू यांच्या पाठीवर मारले. चोरट्यांनी बिरू यांच्याकडील एक लाख 21 हजार 980 रुपयांची रोकड आणि दिलीप भालेराव यांचा मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 41 हजार 980 रुपयांचा ऐवज चोरून नेला चाकण पोलीस तपास करीत आहेत.

.