Chakan : विनापरवाना दारू आणि गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – चाकण पोलिसांनी विनापरवाना दारू आणि गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला. त्यामध्ये पोलिसांनी एकूण चार लाख 98 हजार 800 रुपयांचा दारू आणि गुटखा असा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 13) दुपारी एकच्या सुमारास वाघजाईनगर स्मशानभूमीजवळ करण्यात आली आहे.

विजेंद्र कुमार सतिष कुमार गुप्ता (वय 40, रा. खराबवाडी, ता. खेड), नितीन चौधरी (रा. वाघजाईनगर, ता. खेड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद शांताराम खैरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्यांतर्गत महाळुंगे पोलीस चौकीच्या पोलिसांनी वाघजाईनगर स्मशानभूमीजवळ एक टेम्पो (एमएच 14 / एच यु 2920) अडविला. या टेम्पोमधून विनापरवाना मॅकडोनाल्ड व्हिस्कीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि प्रतिबंधित केलेला गुटखा वाहून नेत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी टेम्पोमधील दोघांवर गुन्हा दाखल करत एकूण चार लाख 98 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.