Chakan : चाकणला चंपाषष्ठी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज – चाकण येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी (दि. २) देवाची पूजा अभिषेक, पालखी सोहळा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चाकण पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी यामध्ये सहभाग घेतला.
चंपाषष्ठी निमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या शोभा मिरवणुकीत चाकणकर नागरिकांनी मोठ्या संखेने हजेरी लावली. खंडोबा सामाजिक संस्थेच्या वतीने चंपाषष्ठीनिमित्त चाकण पंचक्रोशीचे कुलदैवत असलेले खंडेराया देवाची पूजा अभिषेक, पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. चाकणकर ग्रामस्थ, खंडोबा महाराज चंपाषष्ठी उत्सव समिती व खंडोबा मित्र मंडळाच्या वतीने या सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.