एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरून चोरट्यांनी (Chakan News) 91 हजार रुपयांच्या सेट्रींगच्या लोखंडी प्लेट चोरून नेल्या आहेत. ही चोरी वासुली गावच्या हद्दीत 26 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत झाली आहे.
प्रकरणी गणेश पितांबर वाळुंज (वय 35 रा.किवळे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nigdi News : बहिणीला त्रास देतो म्हणून तरुणाला मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हनुमंत शेळके यांच्या बांधकाम साईटवर कन्सट्रक्टर म्हणून काम करतात. त्यांच्या निदर्शनास आले की मोकळ्या जागेत ठेवलेल्या (Chakan News) 91 हजार 300 रुपयांच्या 83 सेंट्रींग च्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्या होत्या. त्यानुसार त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चाकण पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.