Chakan : विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एक महिला तिच्या घरात काम करत असताना दोघांनी मिळून तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 29) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण येथे घडली.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या घराजवळ राहणारा एक इसम (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्याचा एक साथीदार (नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या घरामध्ये झाडलोट करत होत्या. त्यावेळी आरोपी बेडरूमच्या बाहेर खिडकीजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे एकटक बघत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.