Chakan child marriage : चाकण येथे बाल विवाह प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला. त्यानंतर पतीने मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यात मुलगी गरोदर राहिल्याप्रकरणी पतीसह पाच जणांच्या विरोधात बालविवाह, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chakan child marriage) हा प्रकार 19 ऑक्टोबर 2021 ते 24 सप्टेंबर 2022 या कालावधीत सांगली आणि चाकण येथे घडला.

याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती (वय 22), त्याचे आई, वडील आणि पीडित मुलीचे आई वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिचा विवाह लावून दिला.(Chakan child marriage) विवाहानंतर पतीने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने मुलगी गरोदर राहिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.