Chakan Crime News : एअरगनचा धाक दाखवून दुकानातून रोकड पळवणा-या चोरट्याला नागरिकांनी पकडले

0

एमपीसी न्यूज – एअरगनचा धाक दाखवून एका चोरट्याने दुकानातील दोन हजारांची रोकड चोरून नेली. मात्र, परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री खेड तालुक्यातील निघोजे गावात घडली.

दीपक अशोक शिंदे (वय 32, रा. रुपीनगर, तळवडे) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुकेश टिकमजी चौधरी (वय 30, रा. निघोजे) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे निघोजे गावात शिवशक्ती हार्डवेअर हे दुकान आहे. शनिवारी रात्री चौधरी त्यांच्या दुकानात बसलेले असताना आरोपी दीपक दुकानात आला. त्याने चौधरी यांना एअरगनचा धाक दाखवला आणि दुकानाच्या काउंटरमधून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि पैसे घेऊन पळून जात असलेल्या दीपकला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.