Chakan : कंपनीचा संचालक असल्याचे सांगत महिलेची साडेचार लाखांची फसवणूक

हा प्रकार 4 ऑगस्ट रोजी रोजी दुपारी एसबीआय बँकेच्या चाकण शाखेत घडला. : claiming to be a director of a company cheated Rs 4.5 lakh of woman

एमपीसी न्यूज – कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करून महिलेकडून चार लाख 45 हजार 900 रुपये ऑनलाईन माध्यमातून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 4 ऑगस्ट रोजी रोजी दुपारी एसबीआय बँकेच्या चाकण शाखेत घडला.

मानसी महेश पाटील (वय 45, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9990685760 या मोबईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वादोन वाजता अनोळखी आरोपीने 9990685760 या क्रमांकावरून फिर्यादी मानसी यांच्याशी संपर्क केला.

आरोपीने आपण श्रीधा मोटर्स चाकण येथून गणेश पाटील बोलत असून या कंपनीचा संचालक असल्याची बतावणी केली.

मानसी यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपीने मानसी यांना 4 लाख 45 हजार 900 रुपये ऑनलाईन माध्यमातून आरटीजीएस द्वारे भरण्यास सांगितले. मानसी यांनी पैसे भरले,

त्यानंतर आरोपीचा काहीही संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.