chakan : शहराच्या सीमा बंद ; ‘त्या’ व्यक्तीचा अहवाल ‘निगेटिव्ह’

एमपीसी न्यूज : चाकण नगर परिषदेच्या सर्व सीमा मंगळवारी (दि.७) रात्री बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुधवारी (दि. ८) बाहेरील नागरिकांना शहरात येणे अत्यंत कठीण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

चाकण जवळील आरु वस्ती भागातील एका व्यक्तीची लक्षणे कोरोना सदृश्य दिसून आल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. संबधित व्यक्तीची लक्षणे संशयास्पद वाटल्याने खेड तालुक्यातील वैद्यकीय विभाग अलर्ट झाला होता. मात्र, सदरच्या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधव कणकवले यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, चाकणमधील अन्य सर्वच व्यवहार देखील पुढील काही दिवस ठप्प राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होणार आहे. चाकण पालिकेने घेतलेल्या या बंदच्या धाडसी निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात येणार असल्याचे चाकण पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.