BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कंपनीतील रोबोटसह कोट्यवधींचा माल कर्मचाऱ्यांनीच केला लंपास

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणारा रोबोट आणि अन्य महत्वाचे साहित्य असा एकूण 15 ते 18 कोटींचा माल कंपनीतील चार कामगारांनी लंपास केला. हा प्रकार चाकण गावच्या हद्दीत नाणेकरवाडी येथे घडला.

रवींद्र लक्ष्मण चव्हाण (वय 59, रा. बी टी कवडे रोड, घोरपडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मधुकर लिमये, हर्षल दप्तरदार, संदीप पाटील, परेश टेलर या कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळ नाणेकरवाडी येथे इनोवेटिव्ह इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. या कंपनीत चारही आरोपी अॅटोकंपोनंट विभागात काम करतात. सर्व आरोपींनी मिळून कंपनीचा रोबोट, मशिनरी, कच्चा व पक्का माल, टूल्स, ट्रॉली डाइज, कॉम्प्युटर्स, सीसीटीव्ही हार्ड डिस्क, रजिस्टर्स, व्हाउचर्स, चलन इत्यादी 15 ते 18 कोटीचा माल चोरून नेला. हा संपूर्ण प्रकार 13 ऑक्टोबर पूर्वी झाला आहे. मात्र घटना उघडकीस येताच बुधवारी (दि. 31) दुपारी साडेपाचच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.