Chakan : पंचवीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – सहा जणांनी मिळून एका युवकाला पंचवीस लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकी दिली. युवक खंडणी देत नसल्याने आरोपींनी युवकाच्या मेव्हण्याकडे खंडणी मागितली. हा प्रकार 14 डिसेंबर 2018 ते 14 मे 2019 या कालावधीत नाणेकरवाडी आणि ताथवडे येथे घडला.

रामनाथ सोनवणे (रा. कुरूळी ता. खेड), बाळू आप्पा वाघिरे (रा. पिंपरी) आणि त्यांच्या तीन ते चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शांताराम जाधव ( वय 35, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ सोनवणे बाळू वाघिरे आणि त्यांच्या साथीदारांनी गणेश यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी वारंवार गणेश यांना फोन करून धमकी दिली. तसेच रस्त्याने जात असताना गाडी आडवी लावून त्रास दिला. गणेश यांचे मेहुणे संदीप पवार यांचे ताथवडे येथे हॉटेल आहे. त्या हॉटेलवर जाऊन आरोपींनी संदीप पवार यांना 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्यांनाही मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.