Chakan : एकास दगडाने मारहाण : साठ वर्षाच्या वृद्धेवर गुन्हा

आंबेठाण येथील घटना

एमपीसी न्यूज- आंबेठाण ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील जमीन गट नं. 232 मध्ये प्लॉटिंगमध्ये अनधिकृतपणे घुसून प्लॉटिंग मधील बांधकाम हाताने पाडून सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीला लोखंडी खिळे मारून प्लॉटिंगचे बाहेरील कंपाऊंड हाताने पाडून पोकलेंन मशीनचे काचेचे केबिन दगडाने फोडून व एकास दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी साठ वर्षाच्या वृद्ध महिलेवर सोमवारी ( दि. 22 ) चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित हरिचंद्र आगरवाल ( वय 35 वर्षे, रा. वाकड, ता. हवेली,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आगरवाल यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी अलकाबाई नामदेव लांडगे ( वय – 60 वर्षे, रा. आंबेठाण, ता. खेड ) या वृद्ध महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

आंबेठाण येथे सोमवारी ( दि. 22 ) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान अलकाबाई यांनी वरील प्रकार केला. या घटनेत सुशांत पंडित कांगरे ( रा. चाकण.) यांना दगडाने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.