Chakan: महाविद्यालयातील संगणकाची चोरी

एमपीसी न्यूज – महाविद्यालयाच्या कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कार्यालयातील संगणक, त्याचे साहित्य असा 60 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना खेड येथील शेलपिंपळगाव येथे गुरुवारी (दि.6)सायंकाळी घडली.

याप्रकरणी प्रल्हाद बबन होले (वय 57, रा. प्राधिकरण, आकुर्डी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खेड, शेलपिंपळगाव येथे शिवाजी विद्यालय आहे. फिर्यादी होले शाळेत कार्यरत आहेत. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सहा वाजता कार्यालय बंद केले होते. कार्यालयामध्ये संगणक ठेवला होता. मध्यरात्री चोरटे कार्यालयाचा कुलूप-कोयंडा तोडून आतमध्ये घुसले. कार्यालयातील संगणक, त्याचे साहित्य असा 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. चाकण पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.