BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला नेले फरफटत

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- चुकीच्या बाजूने भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरला थांबवण्याचा इशारा केल्यानंतरही कंटेनर चालकाने तसाच पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कंटेनरचा चालकाकडील बाजूचा हँन्डेल धरल्यानंतरही वाहतूक पोलिसाला तसेच पुढे काही अंतरावर फरफटत नेले व कंटेनर समोर उडी मारण्याचा सल्ला चालकाने दिला. हा प्रकार पुणे-नाशिक महामार्गावर चाकण औद्योगिक परिसरात स्पायसर कंपनीच्या समोर गुरुवारी (दि.13) सायंकाळी घडला. या प्रकरणी शुक्रवारी (दि. 14) चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल पांडुरंग तहकीक (वय 25 वर्ष सध्या रा.जाधववाडी, चिखली, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. लाड जळगाव ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई निवृत्ती संभाजी गांगड (वय 39 ) यांनी या प्रकरणी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

याबातची माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी हद्दीत स्पायसर चौक चाकण येथुन स्पायसर कंपनीकडे विरुद्ध दिशेने कंटेनर (क्र.एम एच 14 सी टी 7229) वरील चालक स्वप्निल तहकीक याने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे विरुद्ध बाजूने चालवीत जात होता. फिर्यादी पोलीस शिपाई गांगड व त्याचे सोबत असलेल्या पोलीस कर्मचारी व वॉर्डन यांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो थांबला नाही. तो थांबत नसल्याने पोलीस शिपाई गांगड यांनी त्या कंटेनरच्या ड्रायव्हर बाजूकडील हँडलला पकडुन धरले. तरीही तो कंटेनर चालक तसाच कंटेनर पुढे घेऊन निघाला. पोलीस शिपाई गांगड यांनी त्यास वाहन थांबविण्याची सूचना केली असता कंटेनर चालक स्वप्नील म्हणाला की, ‘तू कंटेनरच्या पुढे उडी टाक’.

फिर्यादी पोलीस शिपाई गांगड यांचे सोबत अरेरावी व उदधट भाषा बोलुन मारहाण करण्यासाठी कंटेनर चालक स्वप्नील अंगावर धावून आला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालक स्वप्नील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.