BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : तिघांनी मिळून कंटेनर लुटला; 10 लाखांचे स्पेअरपार्ट लंपास

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कंटेनरला दुचाकी आडवी लावून कंटेनर चालकाला मारहाण करत कंटेनर पळवला. काही अंतरावर नेऊन कंटेनर मधील दहा लाख रुपयांचे वाहनांचे स्पेअरपार्ट काढून टेम्पोत भरून नेले. ही घटना नाशिक-पुणे रोडवर कुरुळी गावाजवळ स्पायसर चौकात मंगळवारी (दि. 19) पहाटे दोनच्या सुमारास घडली.

कंटेनर चालक सुभाष निवृत्ती कांबळे (वय 57, रा. लोणीकंद, ता. हवेली) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे कंटेनर चालक म्हणून काम करतात. ते त्यांच्या सहकारी योगेश नीरज द्विवेदी याच्यासोबत मंगळवारी पहाटे त्यांच्या कंटेनर (एम एच 12 / एच डी 4349) मध्ये वाहनांचे स्पेअर पार्ट घेऊन जात होते. नाशिक-पुणे महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत स्पायसर चौकात आले असता आरोपींनी त्यांची दुचाकी कंटेनरला आडवी लावून कंटेनर थांबवला.

कांबळे यांचा सहकारी योगेश याला कंटेनरच्या बाहेर ओढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. कांबळे यांनी मारहाण करून कंटेनर म्हाळुंगे रोडवरील टिव्हीएस कंपनीजवळ नेऊन कंटेनर मधील 10 लाख रुपये किमतीचे वाहनांचे स्पेअर पार्ट एका टेम्पोमध्ये जबरदस्तीने भरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.