Chakan Crime : वन विभागाच्या कार्यालयातून 70 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – मेदनकरवाडी येथे असलेल्या वन विभागाच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी 70 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

वन परिमंडळ अधिकारी नितीन मधुकर खताळ (वय 39, रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 30 ऑक्टोबर सायंकाळी सहा ते 1 नोव्हेंबर सकाळी साडेदहा या कालावधीत घडला. मेदनकरवाडी येथे असलेल्या वन विभागाच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप, दोन कॅमेरे, एक टीव्ही आणि दुर्बिण असा एकूण 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.