Chakan Crime : जुन्या भांडणाच्या कारणावरून भाच्याला मारहाण करणा-या मामा विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून मामा आणि त्याच्या मुलाने आपल्या आईला न्यायला घरी आलेल्या भाच्याला बेदम मारहाण केली. याबाबत मामा आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बुधवारी (दि. 28) सकाळी साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील संतोषनगर, भाम येथे घडली. काळूराम बाबूराम कड, दीपक काळूराम कड (दोघे रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश यशवंत नायकरे (वय 36, रा. चास कमान, ता. खेड) असे जखमी भाच्याचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 29) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांच्या आई आरोपी मामाच्या घरी गेल्या होत्या. त्यामुळे आईला आणण्यासाठी गणेश कार घेऊन मामाच्या घरी गेले. मामाच्या घरी गेल्यानंतर मामा आणि त्याच्या मुलाने जुन्या भांडणाच्या कारणावरून ‘तू इथे का आलास’ असे म्हणत भांडण केले. मामाने लाकडी दांडक्याने तर मामाच्या मुलाने हाताने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.