Chakan Crime : सरकारी शेतजमीन मोजणी मान्य नसलेल्या एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – सरकारी मोजणी झाल्यानंतर लावण्यात आलेले दगड आणि सरकारी मोजणी मान्य नसल्याचे म्हटल्याने चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील भोसे गावात पठारे वस्ती येथे घडली.

अविनाश दिलीप लोणारी (वय 26, रा. पठारेवस्ती, भोसे, ता. खेड) यांनी याबाबत शनिवारी (दि. 7) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अकुश वामन गाडेकर, शरद अंकुश गाडेकर, आकाश अंकुश गाडेकर, अतुल अरुण गाडेकर (सर्व रा. पठारेवस्ती, भोसे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोणारी आणि आरोपी यांची शेतजमीन शेजारी शेजारी आहे. आरोपी आणि बाबा कांडेकर यांनी मागील एक महिन्यापूर्वी शेतात सरकारी मोजणी आणली. मोजणी अधिका-यांनी मोजणी करून शेतात निशाण्या लावल्या. त्या निशाणी मान्य नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले.

त्यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत निशाणी केलेला सिमेंटचा पोल उपटून फिर्यादी यांच्या पायावर मारला. यामध्ये फिर्यादी यांच्या नडग्यांवर गंभीर दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.