Chakan : अवैधरित्या मुरूम चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

Crime against six people for stealing pimples illegally

एमपीसी न्यूज – अवैधरित्या मुरूम चोरून नेणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 24) दुपारी आंबेठाण चाकण येथे घडली.

शुभम बाळू गोडसे (रा. सोळु, ता. खेड), मारुती कड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तलाठी खलील गणी शेख (वय 49) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपसात संगनमत करून आंबेठाण गावात पोकलँड आणि डंपरच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या, विनापरवाना मुरूम चोरून नेत होते.

बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपींनी तीन डंपरमध्ये सहा हजार रुपयांचा 15 ब्रास मुरूम नेत होते. त्यावेळी फिर्यादी तलाठी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तलाठी आल्याचे पाहून आरोपींनी पोकलँड, डंपर आणि इनोव्हा कार घेऊन पळून गेले.

याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.