Chakan Crime : फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तीन लाखांच्या खंडणीची मागणी; एकाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच महिलेच्या मुलाला पाठवण्याची धमकी देत महिलेकडे तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही घटना जुलै 2017 पासून 17 नोव्हेंबर 2020 या कालावधीत चाकण परिसरात घडली. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

सनी राजू शिंदे (वय 23, रा. निघोजे, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत 39 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी याने फिर्यादी महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले होते. सनी याने महिलेला बोलावून घेऊन तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याने काढलेले फोटो आणि व्हिडीओ तिच्या मुलाला आणि फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी सनी याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.