Chakan Crime : हॉस्पिटलचे पाणी आणि विजबिलावरून डॉक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज – हॉस्पिटलचे पाणी आणि वीजबिल या कारणावरून जागा मालक आणि जागेत हॉस्पिटल चालवणा-या डॉक्टरमध्ये वाद झाला. जागा मालकाने डॉक्टर दांपत्याला मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली.

ही घटना सोमवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता चिंबळी फाटा, कुरुळी येथील वसुंधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडली. लक्ष्मी मनदीप जयम (वय 26, रा. कुरुळी आणि मोशी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 27) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विक्रम जैद (रा. कुरुळी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिंबळी फाटा, कुरुळी येथील वसुंधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवतात. हॉस्पिटलची जागा आरोपी जैद याची आहे. फिर्यादी यांचे जैद व त्याच्या कुटुंबीयांसोबत हॉस्पिटलचे पाणी आणि विजबिलावरून जानेवारी 2020 पासून वाद सुरु आहेत.

त्या वादाच्या कारणावरून सोमवारी सायंकाळी सहा वाजता जैद याने फिर्यादी यांचे पती डॉ. मनीदीप सुधाकर जयम यांना हॉस्पिटलमध्ये घुसून शिवीगाळ व मारहाण केली. ‘तू आताच्या आता माझे हॉस्पिटल खाली कर. तुला कुठे तक्रार करायची तिथे कर. मी पोलिसांना पैसे देऊन मॅनेज करीन. जर तू माझी जागा खाली नाही केली तर मी तुला ठार मारीन’ अशी जैद याने डॉ. मनीदीप यांना धमकी दिली. पतीला मारहाण केल्याचा जाब फिर्यादी यांनी जैद याला विचारला असता त्याने फिर्यादीला देखील मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.