Chakan Crime : पीएमपी बस प्रवासादरम्यान चार महिलांनी प्रवासी महिलेचे दोन लाखांचे दागिने लांबवले

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – खेड ते भोसरी या मार्गावर पीएमपी बसने प्रवास करत असताना चार अनोळखी महिलांनी प्रवासी महिलेची एक लाख 98 हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेदहा ते साडेअकरा या कालावधीत घडली.

प्रतिभा अमित ढोरे (वय 27, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढोरे या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता खेड येथून भोसरी येथे येण्यासाठी पीएमपी बसने निघाल्या. पीएमपी बस प्रवासादरम्यान चार अनोळखी महिलांनी ढोरे यांची बॅग चोरून नेली. त्यामध्ये एक लाख 98 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.