Chakan Crime : वाकी गावातील लॉजवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील वाकी गावच्या हद्दीत साई पॅलेस नावाच्या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर चाकण पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी (दि. 16) दुपारी केली.

रविंद्र किसन बोंबले (वय 40), अजित तुकाराम बोंबले (वय 42, दोघे रा. वेताळे, ता. खेड), नवनाथ रामचंद्र लोखंडे (वय 30, रा. घेरडे, ता. सांगोला, जि. सोलापूर), पंडित सुरेश सोनवणे (वय 33, रा. सायगाव, ता. खेड), अक्षय नंदू दात्रक (वय 24, रा. करुले, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर खराटे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी वाकी गावातील साई पॅलेस या लॉजमध्ये ठेवले. ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाल्याने चाकण पोलिसांनी लॉजवर कारवाई केली. यात पोलिसांनी पाच जणांना अटक करत दोन महिलांची सुटका केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.