Chakan Crime : घरासमोर पार्क केलेला जेसीबी पळवला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. घरासमोर पार्क केलेली, कंपनीच्या पार्किंगमधील, रस्त्याच्या कडेला लावलेली, दुकानासमोर पार्क केलेली वाहने देखील चोरटे चोरून नेत आहेत. खेड तालुक्यातील सावरदरी येथून एका घरासमोर लावलेला चक्क जेसीबी चोरून नेला आहे.

हा प्रकार मंगळवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आला आहे. अक्षय बाळू गाडे (वय 26, रा. शेलू, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडे यांच्या नावावर असलेला आठ लाख रुपयांचा जेसीबी (एम एच 14 / सी एम 1080) त्यांचा मित्र सुनील शेट्टी यांच्या घरासमोर पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी शेट्टी यांच्या घरासमोरून जेसीबी चोरून नेला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 5) दुपारी पाच ते मंगळवारी (दि. 6) सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत घडला आहे.

दुचाकी आणि कार या वाहनांसह वाहन चोरटे आता मोठ्या अवजड वाहनांना देखील टार्गेट करीत आहेत. त्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.