Chakan Crime: भांडणात मध्यस्थी करणाऱ्यालाच रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज : भांडणात मध्यस्थी करत असाल तर जरा जपून, कारण चाकण येथे सासरा जावयाची भांडणे सोडवणे एकाला चांगलेच महागात पडले आहे.(Chakan Crime) भांडणे सोडवत असताना मध्यस्थालाच लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार भांबोली, खेड येथे शुक्रवारी (दि.19) दुपारी साडे तीन वाजता घडला आहे.

याप्रकरणी ओमजीत बाबाजी पडवळ (वय 20 रा.खेड) यांनी फिर्याद दिली असून ऋषी जगताप (पूर्ण नाव माहिती नाही) , बबन जगताप व नितीन जगताप सर्व राहणार खेड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Alandi deadbody found: आळंदी येथील इंद्रायणी नदीत अनोळखी महिलेचा मृतदेह अढळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र तेजेश लिंबोरे याच्यासह आल्फा टेक इंजिनिअरींग कंपनीजवळ  दुचाकीवरून गेले. तिथे लिंबोरे यांच्या ओळखीचा सुरक्षा रक्षक कांबळे व त्यांच्या जावई यांच्यात मुलीच्या नांदण्यावरून भांडणे सुरु होती. यावेळी फिर्यादी त्यांना समजवून सांगण्यास गेले असता ऋषी जगताप व इतर आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.(Chakan Crime) ऋषी याने लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजूला मारून त्यांना गंभीर जखमी केले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.